ना झोप, ना जेवण, ना विश्रांती; सलग 126 तास नृत्य करण्याचा कुणी कुठं केला विक्रम?

ना झोप, ना जेवण, ना विश्रांती; सलग 126 तास नृत्य करण्याचा कुणी कुठं केला विक्रम?

| Updated on: Jun 03, 2023 | 3:04 PM

VIDEO | तब्बल 126 तास नॉन स्टॉप नृत्य करण्याचा कुणी केला वर्ल्ड रेकॉर्ड

लातूर : लातुरच्या सृष्टी जगताप या 17 वर्षीय मुलीने सलग 126 तास नृत्य सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. या विश्व विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. लातुरच्या दयानंद सभागृहात सृष्टी जगताप ही सलग 126 तास म्हणजे गेली पाच दिवस पाच रात्री सलग नृत्य करीत होती. मोठे परिश्रम आणि अद्वितीय जिद्दीच्या जोरावर तिने हे वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. सृष्टी जगताप ही लातुरच्या दयानंद महाविद्यालयात इयत्ता अकरावीत मध्ये शिकते आहे. तिचे आई संजीवनी आणि वडील सुधीर जगताप हे दोघे शिक्षक आहेत. सृष्टी जगतापला भविष्यात जिल्हाधिकारी सारख्या पदावर जायची इच्छा आहे. तिने या अगोदर सलग 24 तास नृत्य सादर करीत लातूर मध्येच हा विक्रम केला होता. त्याची अशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झालेली आहे. सलग 126 तास नृत्य सादर केल्याचे रेकॉर्ड नेपाळच्या एका कलावंताच्या नावावर होते, आता हे रेकॉर्ड सृष्टी जगतापच्या रूपाने पुन्हा भारताच्या नावावर झाले आहे.

Published on: Jun 03, 2023 03:01 PM