Nashik | नो व्हॅक्सीन, नो एन्ट्री मोहीम; एसटी, खासगी बस, मॉल, हॉटेलमध्ये सर्टिफिकेटशिवाय प्रवेश नाही
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल, या नियमांची आज गुरुवार 23 डिसेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 158 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 478 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 31, बागलाण 19, चांदवड 07, देवळा 08, दिंडोरी 17, इगतपुरी 33, कळवण 07, मालेगाव 07, नांदगाव 11, निफाड 60, पेठ 02, सिन्नर 22, सुरगाणा 09, त्र्यंबकेश्वर 02, येवला 02 अशा एकूण 237 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 229, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 06 रुग्ण असून असे एकूण 478 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 383 रुग्ण आढळून आले आहेत.