Aurangabad : औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नाही, पोलीस आयुक्त कार्यालयाची माहिती

Aurangabad : औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नाही, पोलीस आयुक्त कार्यालयाची माहिती

| Updated on: Apr 28, 2022 | 12:01 PM

भोंग्यांची परवानगी घ्या, असं आवाहन औरंगाबाद पोलिसांनी केलं आहे. औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नसल्याचं समोर आलंय.

औरंगाबाद : भोंग्यांची (Loudspeaker) परवानगी घ्या, असं आवाहन औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी (Police) केलं आहे. औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नसल्याचं समोर आलंय. अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे पोलीस विभागानं भोंग्यांची परवानगी घ्या, असं आवाहन केलंय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नियमांचे पालन होण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायेत. मात्र, भोंग्यांच्या परवानगीबाबद उदासीनता दिसून येत आहे.

Published on: Apr 28, 2022 11:58 AM