भारतातच नाही तर युरोपातील ११ देशात शेतकरी आंदोलनाचं घमासान, मागणी नेमकी काय?

भारतातच नाही तर युरोपातील ११ देशात शेतकरी आंदोलनाचं घमासान, मागणी नेमकी काय?

| Updated on: Feb 15, 2024 | 12:08 PM

गेल्या वेळेप्रमाणे शेतकरी आंदोलन दिल्लीत धडकू नये म्हणून राजधानी दिल्लीत मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सशस्त्र पोलीस, नंतर काँक्रीटचे ब्लॉक, काँक्रीटचे ब्लॉकनंतर तारांचं कुंपन, यानंतर पुन्हा काँक्रीटचे ब्लॉक त्यानंतर पाच रांगा बॅरिकेट्स आणि शेवटी माल वाहतूक करणारे कंटेनर्स...

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन धडकण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. मात्र याघडीला केवळ भारतच नाहीतर युरोपातील ११ देशात आंदोलनं सुरू आहेत. गेल्या वेळेप्रमाणे शेतकरी आंदोलन दिल्लीत धडकू नये म्हणून राजधानी दिल्लीत मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सशस्त्र पोलीस, नंतर काँक्रीटचे ब्लॉक, काँक्रीटचे ब्लॉकनंतर तारांचं कुंपन, यानंतर पुन्हा काँक्रीटचे ब्लॉक त्यानंतर पाच रांगा बॅरिकेट्स आणि शेवटी माल वाहतूक करणारे कंटेनर्स… शेतमालाला आधारभूत किंमत द्या, या मागणीसाठी उत्तर भारताच्या शेतकऱ्यांनी चलो दिल्ली हे आंदोलन पुकारलंय. १३ फेब्रुवारीला हे आंदोलन दिल्लीत धडकण्याचा आंदाज होता. मात्र त्यापूर्वीच सरकारने ठिकठिकाणच्या रस्त्यावर बॅरिकेटिंग केलंय आणि रस्ता रोखलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….

Published on: Feb 15, 2024 12:08 PM