Pathaan Movie : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना नोटीस, काय आहे कारण?

Pathaan Movie : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना नोटीस, काय आहे कारण?

| Updated on: Jan 25, 2023 | 8:20 AM

पठाण चित्रपटाला विरोध करणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण अशी तगडी स्टारकास्ट असणारा चित्रपट पठाण हा आज २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मात्र अद्याप या चित्रपटाला विरोध दर्शवणं सुरूच असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

पठाण चित्रपटाला विरोध करणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून चित्रपटगृहांना पठाण हा चित्रपट प्रदर्शित न कऱण्याची नोटीस देण्यात आली. पठाण या चित्रपटाला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर खाली उतरवत तर पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला.

यानंतरही पठाण चित्रपट प्रदर्शित केला गेला तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र आंदोलनाच्या या इशाऱ्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Published on: Jan 25, 2023 08:20 AM