औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना नोटीस
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी 12 वाजता सिटी चौक पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. 70 ते 80 भाजप कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये उद्या जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला लाखो लोकांची गर्दी होणार, असे दावे शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी औरंगाबाद शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. मागील वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेलाही विक्रमी गर्दी झाली होती. त्यापेक्षाही जास्त लोकं शिवसेनेच्या सभेला जमतील. विरोधकांनी फक्त गर्दीचा आकडा मोजत बसावा, असा दावा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.