Amravti Airport : आता अमरावती ते मुंबई फक्त दोन तासांत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
अमरावती विमानतळाला कृषीमंत्री डॉ. पांजावराव देशमुख यांचं नाव विमानतळाला देण्याची काहींची मागणी होत आहे. तर संत श्री गुलाबराव महाराजांचं नाव विमानतळाला देण्याची काहींची मागणी आहे.
अमरावतीकरांसाठी एक मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. आज अमरावतीमध्ये विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील हजर होते. अमरावती विमानतळाची निर्मिती 1992 मध्ये झाली होती. 1992 मध्ये विमानतळ फक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी सुरू होतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांना विमानतळावरून प्रवास करता येणार आहे.
अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1850 मीटर असून 45 मीटर रुंद आहे.
आशियातील सर्वात मोठं एअर इंडियाचं वैमानिक प्रशिक्षण केंद्र इथे उभारलं जाणार आहे.
विमानतळावर एकाच वेळी ATR/72 सीटर अशी दोन विमान पार्किंग होऊ शकतात.
ऑक्टोबर महिन्यात विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू होणार आहे.
अमरावती विमानतळाचे फायदे काय?
1. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम मधील नागरिकांना मुंबईत लवकर पोहोचता येईल.
2. मुंबईला जाण्यासाठी याआधी अमरावतीहून नागपुरात जावे लागायचे.
3. विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्याने तिकीट सर्वसामान्यांना परवडणार असणार.
4. अमरावतीहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने 12 तास लागत होते, विमानाने पाऊणे दोन तास लागणार.
5. आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी अमरावतीहून मुंबई हे विमान जाणार.
6. विमानसेवेमुळे अमरावतीच्या दळणवळणाचा चांगला विकास होणार.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
