Navratri Festival 2024 : गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...

Navratri Festival 2024 : गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण…

| Updated on: Oct 01, 2024 | 3:59 PM

तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात 3 दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळता येणार असल्याने तरुणाईचा आनंद यंदा द्विगुणीत होताना दिसणार आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावेळी गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून १२ ऑक्टोबरला सांगता होणार आहे. या दरम्यान, एकीकडे मनोभावे देवी मातेची पूजा, आराधना आणि साधना करण्यासोबत दुसरीकडे नऊही दिवस रास गरबा आणि दांडिया तितक्याच जल्लोषात खेळताना तरूणाई दिसते. राज्यभरात लवकरच हाच तरूणाची जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. नवरात्रौत्सवात राज्यभरातील अनेक शहरात गरबा नाईट्स कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र गरब्यासाठी मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असते. परंतु आता गरबा खेळणाऱ्या तरूणाईसाठी आणि रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवरात्रीच्या काळात ३ दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळता येणार म्हणजेच तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरित दिवसांमध्ये रात्री १० वाजेपर्यंतच राज्य सरकारकडून लाऊड स्पीकरला परवानगी देण्यात आली आहे.

Published on: Oct 01, 2024 03:59 PM