‘मराठा कुणबी समाजाचं OBC मध्ये स्वागत, पण…’, आता ओबीसी महासंघाची मागणी काय?
VIDEO | ''मराठा कुणबी समाजाचं ओबीसीत स्वागत, पण आता ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवा, ओबीसीत आरक्षणाचे वाटेकरी वाढले असल्याने आता ओबीसींना लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावं', राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
नागपूर, ७ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मोठी घोषणा केली. ‘ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी असतील, त्यांना कुणबी दाखले दिले जातील’, असे शिंदे म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल ज्यामार्फत जुन्या नोंदीची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निजामकालीन नोंदीनुसार कुणबी दाखले देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच ओबीसी संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, ‘मराठा कुणबी समाजाचं ओबीसीत स्वागत, पण आता ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवा. ओबीसीत आरक्षणाचे वाटेकरी वाढले असल्याने आता ओबीसींना लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावं. ओबीसी समाजाची संख्या ५२ टक्के, आम्हाला ५२ टक्के आरक्षण मिळावं’, अशी मागणी बबनराव तायवाडे यांनी केली आहे.