‘ओबीसींना दूधखुळं समजतात’, विजय वडेट्टीवार यांची भाजपवर सडकून टीका
VIDEO | भाजप आणि काँग्रेस आमनेसामने, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान, राज्यभरात आक्रमक होत भाजपचं आंदोलन
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप करत राज्यभरात भाजपकडून आंदोलन केले जात आहे. या प्रकणामुळे आता भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू असून ते आमने-सामने आले आहेत. अशातच काँग्रेसचे माजी मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ओबीसींना भाजपवाले दूधखुळं समजत आहेत. राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे आता हे ओबीसीचं नव कार्ड खेळत असल्याचा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे. राज्यभरात राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी होत असताना, राहुल गांधी का माफी मागतील ज्यांच्या आईने, आजीने देशासाठी आपलं रक्त सांडवलं आहे. त्यांनी काय चूक केली आहे, ज्याच्या बदल्यात त्यांनी माफी मागावी, असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.