मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतरही ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू, आंदोलन चिघळणार?

मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतरही ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू, आंदोलन चिघळणार?

| Updated on: Sep 12, 2023 | 1:38 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही ओबीसी समाजाची आंदोलनाची भूमिका कायम, आजपासून साखळी उपोषण सुरू आणि ओबीसीतील १० समाजाचे १० तरूण राज्यभरात साखळी उपोषणाला बसणार

नागपूर, १२ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व ओबीसी नेत्यांना आवाहन केले की, तुमचं कोणतंही आरक्षण कमी होणार नाही तर तुम्ही तुमचे सुरू असलेले आंदोलन मागे घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही ओबीसी नेते आपल्या आंदोलनावर ठाम आहे. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी भाष्य केले आहे. ओबीसी समाजाच्या आंदोलनाबद्दल बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले, आजपासून ओबीसीतील १० समाजाचे १० तरूण साखळी उपोषणाला बसणार आहे. तर आज १३ पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. चंद्रपूरमध्ये रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग केले आहे. मुंबईमध्ये आमच्या सहकाऱ्यांची बैठक सुरू आहे, तेही आज आंदोलन सुरू करणार आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. आधी ते म्हणायचे स्वतंत्र आरक्षण मागितले, मग ते आता कुणबी प्रमाणपत्र मागत आहेत. त्यामुळं काल जी प्रेस सरकारने घेतली त्यात स्पष्टता नसल्याचे थेट त्यांनी म्हटले आहे. त्यामुळं सरकारने घोषित करावे की ज्यांच्याजवळ कागदपत्रे नाही त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे.

Published on: Sep 12, 2023 01:38 PM