तर ओबीसी समाज पेटून उठेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा थेट इशारा
'मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा विरोध नाही, तर आधीपासूनच आमची ही भूमिका होती. आज जे १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद सरकार करत आहे. याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. परंतु ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लागता कामा नये'
नागपूर, 20 फेब्रुवारी 2024 | मंत्रिमंडळाने संमत केलेल्या विधेयकानुसार मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे, दरम्यान यावर ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा विरोध नाही, तर आधीपासूनच आमची ही भूमिका होती. आज जे १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद सरकार करत आहे. याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. परंतु ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असे म्हणत बबनराव तायवाडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये. यासह ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारी कोणती भूमिका सरकारने या विशेष अधिवेशनात घेतली तर ओबीसी पेटून उठेल आणि रस्त्यावर उतरणार असा थेट इशाराही त्यांनी दिला.
Published on: Feb 20, 2024 01:07 PM
Latest Videos