मनोज जरांगे पाटील या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्या, कुणी केली खोचक टीका?

मनोज जरांगे पाटील या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्या, कुणी केली खोचक टीका?

| Updated on: Jul 14, 2024 | 3:38 PM

आरक्षणासाठी मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या त्याला हा मनोज जारांगे पाटील जबाबदार आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रला काळिमा आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या भुताला सरकार का घाबरत आहे हे कळत नाही, असा हल्लाबोल ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की...

मनोज जारांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत आकलन शून्य आहे. मनोज जारांगे पाटील यांचा आराज्यक निर्माण करणे हाच एकच उद्देश आहे. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या त्याला हा मनोज जारांगे पाटील जबाबदार आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रला काळिमा आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या भुताला सरकार का घाबरत आहे हे कळत नाही, असा हल्लाबोल ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, मराठा नेत्यांनी हे डोक्यातून काढून टाका. ओबीसी आहे म्हणून तुम्ही निवडून येत. आम्ही पण दाखवू, असा इशारात लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला दिला. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही शिव्या खाता. या भुताला वेळीच बंधन घालावे आणि बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्यावे, अशी खोचक टीकाच लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.

Published on: Jul 14, 2024 03:38 PM