“राज ठाकरे खरंच या देशाचे नागरिक?, प्रबोधनकारांच्या घरात जन्म पण तरीही…” लक्ष्मण हाके भडकले
महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही', असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर पलटवार करत ते म्हणाले...
‘बाहेरच्या राज्यातून मुलं येतात. आपल्या नोकऱ्या बळकावतात. आपल्या राज्यात शिक्षण घेतात, आपल्या मुला-मुलींना शिक्षण, रोजगार मिळत नाही, याचा आपण विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात सर्व गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही’, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पलटवार केलाय. “राज ठाकरे यांचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरात झाला आहे. पण तरीही ते अशाप्रकारची बेजबाबदार किंवा असंविधानिक वक्तव्य करत आहात, याची कीव करावीशी वाटते. राज ठाकरे खरंच या देशाचे नागरिक आहेत का? तुम्ही एक पक्ष चालवत आहात, ज्या महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेपैकी जवळपास ८० टक्के जनता ही आरक्षणाच्या अंतर्गत येते. पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या नावाने पक्ष चालवत असाल आणि अशाप्रकारे बेजबाबदार वक्तव्य करत असाल तर तुमच्या पक्षाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पक्ष वाढीलाही आमच्या हार्दिक शुभेच्छा” असा खोचक टोला लक्ष्मण हाके यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.