‘मुस्लिमांना OBC मध्ये आरक्षण द्या, हे जरांगेंचं अज्ञानी वक्तव्य’, कुणाचा हल्लाबोल?
मनोज जरांगे पाटील आणि बाळासाहेब सराटे हे ओबीसी आरक्षणाबद्दल गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवत आहेत, असा आरोप सकल ओबीसी समाजाचे नेते मंगेश ससाणे यांच्याकडून करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण द्या, हे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य म्हणजे....
गेल्या दोन दिवसांपासून ओबीसी आरक्षण, ओबीसी आरक्षणाची टक्केवारी यांबद्दल मनोज जरांगे पाटील आणि बाळासाहेब सराटे हे ओबीसी आरक्षणाबद्दल गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवत आहेत, असा आरोप सकल ओबीसी समाजाचे नेते मंगेश ससाणे यांच्याकडून करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण द्या, हे मनोज जरांगे पाटील यांचं अज्ञानी वक्तव्य असल्याचे म्हणत मंगेश ससाणे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील तुम्हाला याची तरी माहिती हवी की मुस्लिमांच्या २० ते २५ जाती या ओबीसीमध्ये आहेत. मुस्लिमच नाही तर ख्रिश्चन धर्माच्या जातींचा ओबीसी यादीत समावेश आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पहिले अभ्यास करावा, असा सल्लाही मंगेश ससाणे यांनी दिलाय. बघा नेमकं काय म्हणाले?
Published on: Jun 25, 2024 11:56 AM
Latest Videos