जरांगेंनी पूर्ण महाराष्ट्रात दोन जातीत वाद…., ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी सामाजेच नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन्ही नेत्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे उपोषणस्थळी आज वैद्यकीय पथक दाखल झालं. पण उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. ते उपोषणावर ठाम आहेत. अशातच उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांच्या पत्नीसह मुलांनी त्यांची भेट घेतली.
गेल्या सहा दिवसांपासूनच्या उपोषणामुळे ओबीसी सामाजेच नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन्ही नेत्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे उपोषणस्थळी आज वैद्यकीय पथक दाखल झालं. पण उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. ते उपोषणावर ठाम आहेत. अशातच उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांच्या पत्नीसह मुलांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘नवनाथ वाघमारे यांच्या पोटात अन्न नाही. त्यांचं गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने योग्य निर्णय घ्यावा. ओबीसींवर अन्याय करू नये. त्यांच्या जीवाला धोका असला तरी हे आंदोलन थांबणं शक्य नाही.’, असे त्यांनी म्हटलंय. मराठा नेते मनोज जारांगे यांनी दोन जातीमध्यें जो वाद निर्माण केला आहे तो बंद करावा. ही त्यांना विनंती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब होत असल्याचेही नवनाथ वाघमारे यांच्या पत्नीनें स्पष्ट म्हटलंय.