आज ओबीसी आरक्षण धोक्यात, उद्या दलितांचंही आरक्षण… प्रकाश शेंडगे यांचा नेमका इशारा काय?
हे आरक्षण त्यांनी हस्तगत केलं तर पुढचा नंबर दलितांचा असे म्हणत म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावेल, असे म्हणत प्रकाश शेंडगे यांनी आंबेडकर यांना काय केली विनंती?
हिंगोली, २६ नोव्हेंबर २०२३ : ओबीसी आरक्षणावर भाष्य करताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी सूचक इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत नुसते. आम्हाला दिलेला आरक्षण बाबासाहेबांच्या आजोबांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्याच संरक्षण करणे आमचे जबाबदारी आहे. ओबीसी आरक्षण आज धोक्यात आलेलं आहे. मराठा समाजाचा सारखा समाज कुणब्याचे दाखले काढून सरसकट ओबीसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आज ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय तर उद्या दलित बांधवांचं आरक्षण धोक्यात येईल, असे म्हणत प्रकाश शेंडगे यांनी इशारा दिलाय. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस आम्हाला मदत केली पाहिजे. हे आरक्षण त्यांनी हस्तगत केलं तर पुढचा नंबर दलितांचा असे म्हणत म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावेल, असे म्हणत त्यांनी आंबेडकर यांना विनंतीही केली.