मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास…, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय दिला इशारा?
VIDEO | आरक्षण मिळावं म्हणून मराठो ठाम, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जर सरकारनं मान्य केली तर तो ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागेल आणि असं मेळावे करून सरकारवर दडपण आणणार असाल तर... ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा थेट इशारा
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाचा वाद वाढत चाललाय, वातावरण तापत चाललंय. जरांगे पाटलांनी घेतलेल्या विराट सभेमुळे ओबीसी समाज भयभीत झाला असल्याचे म्हटले जात आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जर सरकारनं मान्य केली तर तो ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. मराठा आरक्षण टिकू शकलं नाही ही चूक सरकारची आहे पण भोगावं ओबीसींना लागतंय. असं मेळावे करून सरकारवर दडपण आणणार असाल तर आम्हालासुद्धा मोठा एल्गार मेळावा घ्यावा लागेल, असेही शेंडगे म्हणाले तर येत्या १० तारखेला हिंगोलीत हा मेळावा आम्ही आयोजित केलाय. सर्व ओबीसी इथे येऊन ओबीसींची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही शेंडगे यांनी म्हटलंय.