OBC Protest | '... त्याशिवाय ओबीसी आंदोलन मागे घेणार नाही', राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा काय?

OBC Protest | ‘… त्याशिवाय ओबीसी आंदोलन मागे घेणार नाही’, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा काय?

| Updated on: Sep 18, 2023 | 4:26 PM

VIDEO | गेल्या १० दिवसांपासून राज्यभर ओबीसी आंदोलन सुरु असताना या आठवड्यात चर्चेला जाण्यास ओबीसी नेते तयार असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॅा. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.

नागपूर, १८ सप्टेंबर २०२३ | राज्यातील ओबीसी आंदोलन मागे घ्यावं, म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. आता ओबीसी नेते मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासोबत चर्चेला तयार झाल्याचे समोर आले आहे. गेल्या १० दिवसांपासून राज्यभर ओबीसी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे या आठवड्यात चर्चेला जाण्यास ओबीसी नेते तयार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, याबाबत मुंबईतील सरकारसोबतच्या बैठकीत लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही, तर आम्ही चर्चेस तयार आहोत, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॅा. बबनराव तायवाडे यांनी सांगितलं आहे. बघा नेमकं काय म्हणाले डॅा. बबनराव तायवाडे?

Published on: Sep 18, 2023 04:26 PM