ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी, अजित पवारांची माहिती

ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी, अजित पवारांची माहिती

| Updated on: Feb 01, 2022 | 11:35 PM

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्यात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. तशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्द्यावर आज राज्यात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. तशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. त्यानंतर  महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal), मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांची भेट घेतली.