Odisha Fisherman Rescue | वादळात अडकलेल्या 11 मच्छिमारांना एअरलिफ्ट करून वाचवलं

| Updated on: May 11, 2022 | 2:58 PM

असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस

असनी चक्रीवादळाच्या (Asani cyclone) प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होताच.ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला होता.बंगालच्या उपसागरातील खोल दाब वायव्य दिशेने 16 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत होता. त्यामुळे चक्रीवादळ तीव्र झाले. ही वादळाची प्रक्रिया पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरु झाली.बंगालच्या उपसागरात चक्री वादळाची परिस्थिती निर्माण झाली. ओडिशाच्या समुद्रात मच्छीमार अडकले होते.  मच्छीमारांना एअरलिफ्ट करून वाचविण्यात आलं.  तटरक्षक दलानं बचाव मोहिम बचाव मोहिम सुरू केली. याआधी डिसेंबर 2021 मध्ये जावाद चक्रीवादळ भारतात आले होते. त्याचवेळी, गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये, यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये कहर केला होता. त्यानंतर आता असनी चक्रीवादळ येणार असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे. या चक्रीवादळाला श्रीलंकेनं असनी हे नाव दिलं आहे.

Published on: May 11, 2022 02:58 PM