सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत अधिकारीच नापास! 120 पैकी 84 अधिकाऱ्यांच्या दांड्या उडाल्या
राज्यात सध्या अनेक स्पर्धा परिक्षा होत आहेत. त्याची तयारी अनेक परिक्षार्थींनी रात्रंदिवस केली आहे. तर झोकून देऊन परिक्षा देत आहेत. यात काही परिक्षांचा निकाल आला तर काहींच्या परिक्षा अजुनही सुरू आहेत. यात काही पास तर काही नापास झाले आहेत. मात्र जर अधिकारीच एखाद्या परिक्षेत नापास झाले तर....
अमरावती : 23 ऑगस्ट 2023 | राज्यातील अनेक विभांगाच्या भरती निघालेल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे परिक्षा देताना तर निकालाची प्रतिक्षा करत आहेत. याचदरम्यान मात्र एका जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांसाठी घेतलेल्या परिक्षेत अधिकारीच नापास झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यात याबाबत जोरदार चर्चा होत आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेतली जाते. त्याप्रमाणे यंदाही ती घेण्यात आली. यावेळी अमरावती जिल्हा परिषदेचा निकाल हा 21 ऑगस्टला घोषित करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय घोषित केलेल्या या निकालात धक्कादायक बाब समोर आली असून परिक्षेचा फक्त 23 टक्केच निकाल लागला आहे. तर 120 पैकी 84 अधिकाऱ्यांच्या दांड्या उडाल्या असून ते या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत नापास झाले आहेत. तर फक्त 28 अधिकारी व कर्मचारी हे पास झाले आहेत. हा निकाल विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.