लोकशाहीचा गळा घोटणारं मोदी सरकार, शरद पवार गटाची घोषणाबाजी, कुठे झाले पदाधिकारी आक्रमक?

लोकशाहीचा गळा घोटणारं मोदी सरकार, शरद पवार गटाची घोषणाबाजी, कुठे झाले पदाधिकारी आक्रमक?

| Updated on: Dec 26, 2023 | 7:09 PM

संसदेत तरुणांच्या घुसखोरी प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या खासदारांच्या निलंबनावरून अमरावतीत शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहे. अमरावतीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादीच्या वतीने बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू

अमरावती, २६ डिसेंबर २०२३ : अमरावतीमध्ये शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संसदेत तरुणांच्या घुसखोरी प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या खासदारांच्या निलंबनावरून अमरावतीत शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहे. अमरावतीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादीच्या वतीने बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 146 खासदारांचे निलंबन करून केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप यावेळी शरद पवार गटाचे पदाधिकाऱ्यांनी सरकारवर केला. इतकंच नाही तर भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

Published on: Dec 26, 2023 07:09 PM