जुन्या पेन्शन बाबत तोडगा निघेलच पण काँग्रेस ढोंग करतय : सुधीर मुनगंटीवार
काँग्रेसकडून यासह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे
नागपूर : राज्यीत जुनी पेन्शन लागू करण्यावरून कर्मचारी वर्ग निर्णायक मार्गावर आला असून संपाचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर काँग्रेसकडूनही यासह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावर भाजप नेते कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. तसेच या संपावर आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघेल असेही ते म्हणाले. तर काँग्रेसचा आजचा राजभवनावरील मोर्चा म्हणजे ढोंग असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.