…आता योजना लागू व्हायलाच हवी; जे.जे रुग्णालयातील सरकारी कर्मचाऱ्यांचा यल्गार
या संपात जे जे हॉस्पिटलमधील कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. तसेच जुनी पेन्शन योजना लागू हवी घोषणा देताना दिसत आहेत.
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू हवी याकरता कालपासून राज्य सरकारी कर्मचारी आणि निम्म सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा थेट परिणाम हा आरोग्य सेवेवर होत आहे. आता या संपात जे जे हॉस्पिटलमधील कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. तसेच जुनी पेन्शन योजना लागू हवी घोषणा देताना दिसत आहेत. तर काल या संपातून शिक्षक संघटना बाहेर पडली आणि मेस्मा कायदा ही लागू झाला त्यावरही आंदोलकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी जी शिक्षक संघटना बाहेर पडली ती मुळातच संपात नव्हती. तर मेस्मा लागू करा किंवा आणि काहीही या संपात पुन्हा फुट पडण्याची शक्यता नाही. म्हातारपणी मरण्यापेक्षा आता लढून मरू. सरकारने खूप अभ्यास केलेला आहे. आता सरकारला अभ्यास करण्याची वेळ नाही असेही आंदोलक कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.