पेट्रोल-डिझेलवर नाही तर आता रस्त्यावर धावणार हायड्रोजन बस, बघा भन्नाट वैशिष्ट्य
VIDEO | येत्या वर्षभरात ही हायड्रोजन बस रस्त्यावर धावण्याची शक्यता, एकदा हायड्रोजन भरल्यानंतर ही बस ४०० किलोमीटर धावणार
मुंबई : हायड्रोजन बस विकसित करण्यासाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने रिलायन्ससोबत भागीदारी केली आहे. नैसर्गिक संसाधनांची कमतरता आणि वाढतं वायू प्रदूषण त्याचबरोबर उत्सजर्नाचे नकारात्मक परिणाम लक्षात घेत या खास बसची निर्मिती करण्यात आली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने रिलायन्ससोबत भागीदारी करत ही हायड्रोजन बस निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या वर्षभरात ही हायड्रोजन बस रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकदा हायड्रोजन भरल्यानंतर ही बस ४०० किलोमीटर धावणार आहे. लो फ्लोअर या बसमध्ये २ मीटर आसन क्षमता उपलब्ध आहे. या बसमध्ये ३२ ते ४९ प्रवासी प्रवास करू शकतील. याशिवाय चालकासाठी स्वतंत्र सीट देण्यात आली आहे. हायड्रोजन बसेसच्या माध्यमातून पर्यावरण स्वच्छ करण्याचा ऑलेक्ट्रा कंपनीचा उद्देश आहे.
Published on: Feb 23, 2023 06:47 PM
Latest Videos