Sakshi Malik : कुस्तीपटू साक्षी मलिकची मोठी घोषणा, पत्रकार परिषदेत रडत म्हणाली…
ब्रिजभुषण सिंह यांचा सहकारी कुस्ती महासंघात अध्यक्ष म्हणून निवड अन्.... ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक हिने वयाच्या ३१ व्या वर्षी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी निवृत्तीची घोषणा केली.
नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३ : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक हिने वयाच्या ३१ व्या वर्षी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. ब्रिजभुषण सिंह यांचा सहकारी कुस्ती महासंघात अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. तर या निवडणुकीच्या निर्णयाचा निषेध करत साक्षी मलिकने ही निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. साक्षी मलिकने बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये शेवटची स्पर्धा केली होती, जिथे भारतीय कुस्तीपटूने महिलांच्या 62 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने 2009 आशियाई ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 59 किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक जिंकले.
Published on: Dec 21, 2023 11:46 PM
Latest Videos