Omar Abdullah On Pehalgam Attack : हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? – ओमर अब्दुल्ला
Omar Abdullah Emotional Speech : आजपासून जम्मू-काश्मीरच्या विधानसभा विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करून शोक व्यक्त केला.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून हल्ल्यातील मृत पर्यटकांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी सभागृहात बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, या हल्ल्यातले पीडित मला विचारत होते, आमचा काय दोष होता? यातले काही आपल्या परिवारासोबत आले होते. कोणाचं नवीन लग्न झालेलं होतं, आनंदाने सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या या निष्पाप लोकांचा काय दोष होता? अशी खंत ओमर अब्दुल्ला यांनी बोलताना व्यक्त केली. तसंच ज्या लोकांनी हे केलं ते सांगतात की आम्ही तुमच्या भल्यासाठी हे केलं आहे. पण आम्ही त्यांना म्हंटलं होतं का असं करा? आमच्या नावाने या 26 निष्पाप लोकांना मारण्यास आम्ही सांगितलं होतं का? आम्ही कोणीच या हल्ल्याचं समर्थन करत नाही.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
