देशात ओमिक्रॉनचा धोका; आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण 31 जानेवारीपर्यंत स्थगित

देशात ओमिक्रॉनचा धोका; आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण 31 जानेवारीपर्यंत स्थगित

| Updated on: Dec 10, 2021 | 10:59 AM

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाचा वेग इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक आहे. यातच देशात फ्रेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय विमान उड्डानांवरील बंदीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाचा वेग इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक आहे. यातच देशात फ्रेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय विमान उड्डानांवरील बंदीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला ही बंदी 15 डिसेंबरपर्यंतच होती. मात्र आता त्यामध्ये वाढ करून तिचा कालावधी 31 जानेवारी इतका करण्यात आला आहे.

Published on: Dec 10, 2021 10:59 AM