Pune Omicron Case | पुण्यात 1 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 6 जणांना ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग
राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे.
पुणे : राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं आहे.
सहापैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती
सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.