Omicron : राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू, ‘असे’ असतील नवे नियम
सरत्या वर्षाबरोबर कोरोनालाही निरोप देण्याची चिन्हं दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा तयार होतोय. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून सैल झालेले निर्बंधाचे दोर पुन्हा घट्ट होत आहेत.
मुंबई : सरत्या वर्षाबरोबर कोरोनालाही निरोप देण्याची चिन्हं दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा तयार होतोय. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून सैल झालेले निर्बंधाचे दोर पुन्हा घट्ट होत आहेत. राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून पुन्हा काही नवे निर्बंध लावले आहे.फक्त मुंबईबाबतीत विचार करायचा झाला तर मुंबईतल्या चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी लागू झालीय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी असेल, जमावबंदीत 5 पेक्षा जास्त लोकं एकत्र येऊ शकणार नाहीत. फटाके फोडता येणार नाहीत. लग्न समारंभ, कार्यक्रमांसाठी आता फक्त 100 जणांनाच परवानगी असणार आहे.
Latest Videos