Special Report | पुण्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं
ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताचं जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांच उद्यापासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग केलं जाणार आहे. उद्यापासून व्यक्तींच्या संपर्कातील मोहिमेला होणार सुरुवात करण्यात येणार आहे.
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे सात रुग्ण आढळताच प्रशासन कामाला लागले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी उद्यापासून पुण्यात टेस्टिंग आणि ट्रेसिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताचं जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांच उद्यापासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग केलं जाणार आहे. उद्यापासून व्यक्तींच्या संपर्कातील मोहिमेला होणार सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली. तसेच ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलमधील बेडसंदर्भात पुरेसं नियोजन, तसेच ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही पवार यांनी सर्व रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
Latest Videos