Special Report | ओमिक्रॉन भारतासाठी शाप ठरणार की वरदान ?

Special Report | ओमिक्रॉन भारतासाठी शाप ठरणार की वरदान ?

| Updated on: Dec 30, 2021 | 10:33 PM

कोरोनाच्या मोठ्या रुग्णवाढीसोबतच राज्यात आज तब्बल 198 ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईतल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 190 वर गेली आहे. तर ठाण्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 450 रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाच्या मोठ्या रुग्णवाढीसोबतच राज्यात आज तब्बल 198 ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईतल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 190 वर गेली आहे. तर ठाण्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 450 रुग्णांची नोंद झाली आहे तर 125 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. एकिकडे कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची झपाट्याने वाढ त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात ओमिक्रॉनचा विळखा वाढतोय, त्यामुळेच प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे, नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मुंबईतले नियम आणखी कडक करण्यात आले आहेत, एकट्या मुंबईतच नाही तर अनेक राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरातही नियम कडक करण्यात आले आहेत.