वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचं आमंत्रण नाही, कपिल देव यांनी केली खंत व्यक्त, अन् म्हणाले…
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अंतिम सामन्यावरील केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप, अंतिम सामन्यासाठी लता मंगेशकर, शहारूख खान, आर्यन खान, दिपीका पादुकोण, सचिन तेंडूलकर, आयुषमान खुराना, रणबीर सिंग, सदगुरू असे अनेक सेलिब्रिटी हजर पण १९८३ साली विश्वविजेता भारतीय संघाचे कप्तान २०२३ च्या अंतिम सामन्याला गैरहजर?
मुंबई २१ नोव्हेंबर २०२३ : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अंतिम सामन्यावरील केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. अहमदाबाद येथील अंतिम सामन्याचं निमंत्रणच आलं नाही, असे कपिल देव यांनी म्हटले. अंतिम सामन्यासाठी लता मंगेशकर, शहारूख खान, आर्यन खान, दिपीका पादुकोण, सचिन तेंडूलकर, आयुषमान खुराना, रणबीर सिंग, सदगुरू असे अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले. १९८३ साली विश्वविजेता भारतीय संघाचे तुम्ही कप्तान पण तुम्ही २०२३ च्या अंतिम सामन्याला का गेला नाहीत, असा सवाल त्यांना विचारण्यात आला? त्यावर त्यांनी मला बोलवलं नसल्याचे स्पष्ट सांगितले. मला वाटत होतं १९८३ साली विश्वचषक जिंकणारा पूर्ण संघ तिथं असावा, मात्र इतर खूप काही कामं सुरू आहेत. त्यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना विसर पडतो, असे कपिल देव यांनी म्हटले. यावरून काँग्रेसने भाजवरच आरोप केलेत.