अन् अजित पवार यांनी खांद्यावर घेतला पठाणी रूमाल आणि डोक्यावर घातली नमाजी टोपी
VIDEO | मुस्लिम समाजाच्या वतीने अजित पवार यांचा रमजान महिन्यातील सणानिमित्त मुस्लिम समाजाची नमाजी टोपी आणि पठाणी रुमाल घालून सन्मान
सातारा : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून वडूज येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची त्यांनी आज बैठक घेतली. यावेळी बैठकीनंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अजित पवार यांचा रमजान महिन्यातील सणानिमित्त मुस्लिम समाजाची नमाजी टोपी घालून आणि पठाणी रुमाल घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक सलोखा राखून अजित पवार यांनीही मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. रमजानचा महिना पवित्र महिना हा मुस्लिम बांधवांच्या शुभेच्छांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात मुस्लिम समाजाचे लोक महिनाभर उपवास करतात आणि अल्लाहाची पूजा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे वडूज येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांना भेट दिली यावेळी त्यांची तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेतली.