केरळमध्ये अज्ञात व्यक्ती बॉम्ब फेकताना सीसीटीव्हीत कैद
केरळमधील तिरुअनंतपुरम इथल्या CPI (M) मुख्यालयावर बॉम्ब फेकून दुचाकीस्वाराने पळ काढलला. मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती कळताच पोलिसांनी तपास सुरू केला.
केरळमधील तिरुअनंतपुरम इथल्या CPI (M) मुख्यालयावर बॉम्ब फेकून दुचाकीस्वाराने पळ काढलला. मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती कळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरुवारी रात्री एक व्यक्ती सीपीआय पक्षाच्या मुख्यालयासमोर आपली दुचाकी मागे वळवताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती हातात बॉम्ब घेऊन पक्षाच्या मुख्यालयाच्या इमारतीवर तो फेकतो आणि तिथून पळ काढतो. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बॉम्बहल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासोबतच वाहनाची तपासणी सुरू केली आहे.
Published on: Jul 01, 2022 12:59 PM
Latest Videos