नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, रुग्णालयात राहणार
नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ओरोस येथील रुग्णालयात (oros district hospital)दाखल करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्यानंतर नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ओरोस येथील रुग्णालयात (oros district hospital)दाखल करण्यात आले होते. मात्र, काल रात्री नितेश राणे यांचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यांना छातीत दुखू लागल्याने ओरोस रुग्णालयातून कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.
Latest Videos