'सूडाचं राजकारण कोण करतंय हे उभा महाराष्ट्र पाहतोय' मलिकांच्या ED चौकशीवर भातखळकरांचा टोला

‘सूडाचं राजकारण कोण करतंय हे उभा महाराष्ट्र पाहतोय’ मलिकांच्या ED चौकशीवर भातखळकरांचा टोला

| Updated on: Feb 23, 2022 | 11:25 AM

Atul Bhatykhalkar on Nawab Malik's ED inquiry : सूडाचं राजकारण कोण करतेय हे उभा महाराष्ट्र पाहतोय, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या यांच्या केसेस पाहिल्याचं ते म्हणालेत.

सूडाचं राजकारण कोण करतेय हे उभा महाराष्ट्र पाहतोय, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या यांच्या केसेस पाहिल्याचं ते म्हणालेत. नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतुल भातखळकर बोलत होते. केंद्रीय यंत्रणांचा तपास कायद्याच्या कक्षेत राहून होत असतो. नवाब मलिकांना जर ED ने बोलवल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. माझ्या माहितीनुसार इक्बाल कासरकर पासून दाऊदच्या संबंधित अनेक लोकांनी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, किंबहुना नवाब मलिक हे त्यांचे मित्र म्हणून वावरतात हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला उत्तर देतील. ED कायद्याच्या कक्षेत राहून काम करेल. मलिकांना मान्य नसेल तर न्यायालय आहेच, असंही ते म्हणालेत. दाऊदच्या संबंधित लोकांबरोबर मलिकांचे आर्थिक संबंध आहेत हे फडणविसांनी दोन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेत पुराव्यासहित उघड केले. त्याच स्पष्टीकरण नवाब मलिक देऊ शकले नाही. ज्यांना असं वाटत की सुडाचं राजकारण आहे त्यांना न्यायालय आहे. चौकशीला का घाबरता, किरीट सोमय्या घाबरले नाहीत, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी या संपूर्ण कारवाईवरुन निशाणा साधलाय.

Published on: Feb 23, 2022 11:23 AM