छगन भुजबळ यांचा राजीनामा मंजूर की नाही? नेमकं काय म्हटलंय ‘त्या’ राजीनामा पत्रात?
गेल्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनीच ओबीसी एल्गार सभेतून तसा मोठा गौप्यस्फोट केला.
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भूमिका पटत नसल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. गेल्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनीच ओबीसी एल्गार सभेतून तसा मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासंदर्भात बैठक घेतली. दरम्यान, त्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून हा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती सरकारकडून करण्यात आली.