शरद पवार यांचा फोटो ठेवला, त्यांनी झापले, प्रफुल्ल पटेल म्हणाले ‘कुणाकडे नाराजी…?’
अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांनी माझे फोटो वापरू नयेत असे शरद पवार यांनी बजावले. तर, प्रफुल्ल पटेल यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात शरद पवार यांच्यासोबत काढलेला फोटी tweet केला. त्यावरून शरद पवार यांनी त्यांना तंबी दिली.
मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांच्या गटाने 40 आमदारांना अपात्र करावे म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. तर, अजितदादा गटाने 10 आमदारांना अपात्र करावे असे निवडणूक आयोगाला कळवले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पत्र लिहले आहे. मात्र, आमची बाजू भक्कम आहे. आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आम्ही निश्चिंत आहोत. एकनाथ शिंदे यांच्यासारखे आमचे प्रकरण नाही. त्याची आणि आमची केस वेगवेगळी आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करुनच आम्ही निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे खासदार (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचा निर्णय काय होईल हे माहित नाही. त्यावर बोलायचे नाही. शरद पवार यांनी फोटो वापरू नका असे सांगितले. पण, राजकारण आणि शिष्टाचार वेगळा ठेवायचा नाही का? आम्ही वेगळी राजकीय भुमिका घेतली म्हणून त्यांच्याविषयी आदर कमी झाला नाही. त्यांनी कुणाकडे नाराजी व्यक्त केली का? असे पटेल म्हणाले.