मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अद्याप सुरूच, प्रकृती आणखी खालावली पण उपचारास नकार
सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. सगेसोयऱ्यांच्या मागणीला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र तरीही ते उपचारांना नकार देताय.
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. मात्र उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. सगेसोयऱ्यांच्या मागणीला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र तरीही ते उपचारांना नकार देताय. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरवाली सराटी गावात डॉक्टरांचं पथक दाखल झालं. मात्र नाडी आणि बीपी तपासण्यासाठी जरांगेंनी विरोध केला. जरांगे पाटील यांना मंगळवारी भेटण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले, यावेळी त्यांनी जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली मात्र त्याला त्यांनी नकार दिला. तर ग्रामस्थांनी देखील जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली. पण जरांगे कुणाचं ऐकताना दिसत नाहीये.