मुंबईच्या बीकेसी येथे वज्रमूठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात, बघा ‘मविआ’चं शक्तीप्रदर्शन
VIDEO | महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, बघा सभेच्या तयारीचा थेट आढावा
मुंबई : 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज महाविकास आघाडीची वज्रमूठ ही जाहीर सभा मुंबईमधील बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या सभेची जोरदार तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईमधील ही वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेकरता संपूर्ण मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, अशा आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले आहेत. आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधित करणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे कोणता संदेश देणार, काय मार्गदर्शन करणार आहेत. हे देखील पाहणं तितकचं महत्वाचं असेल. तर मुंबईतील बीकेसीच्या मैदानातून मविआचे मोठे नेते, उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार कुणावर केली जाणार टीका? हे देखील उद्याच्या मविआच्या जाहीर सभेतून समोर येणार आहे.