धावपट्टीवर साकारलं सचिन तेंडूलकरचं चित्रं, कॅलीग्राफीद्वारे अनोख्या शुभेच्छा, बघा व्हिडीओ
VIDEO | सचिन तेंडूलकर यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी कॅलीग्राफीद्वारे दिल्या मास्टर ब्लास्टरला अनोख्या शुभेच्छा
मुंबई : वरळीच्या खेळपट्टीवर क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना प्रसिद्ध कॅलिओग्राफर अच्युत पालव यांनी खेलपट्टीच्या आकारा एवढ्या कॅनव्हासवर केलिग्राफीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा अत्यंत अनोख्या प्रकारे दिल्यात. त्याच बरोबर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या सुवर्ण महोत्सव 50 व्या वाढदिवसानिमित्त एक आगळी वेगळी चित्रकला स्पर्धा ही आयोजन करण्यात आली. ज्यामघ्ये 50 स्पर्धकांनी बॅटवर सचिनची चित्रकारी केली. आज 24 एप्रिल रोजी सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस वरळीच्या साईदत्त सेवा मंडळाने कलेचे अनोखे सादरीकरण करत वरळी स्पोटर्स क्लब येथे साजरा केला. पन्नास बॅट्सवर सचिनचे पोट्रेट कलाकारानी साकारले. या बॅट्स सचिनला भेट म्हणून पाठविण्यात येणार आहे. तर जगविख्यात कॅलिओग्राफर अच्युत पालव यांनी खेळपट्टीच्या आकारा एवढ्या कॅनव्हासवर केलिग्राफीद्वारे सचिनचे विक्रम साकारून त्याला अनोख्या पद्धतिने शुभेछा दिल्या. तर व्यंगचित्रकार निलेश जाधव यांनी सचिनचे सुंदर असे व्यंगचित्र साकारले.