सौभाग्याच्या लेण्यावर महिलांनी रेखाटले छत्रपती शिवराय, बघा अनोखं पेंटिंग

सौभाग्याच्या लेण्यावर महिलांनी रेखाटले छत्रपती शिवराय, बघा अनोखं पेंटिंग

| Updated on: Feb 19, 2023 | 7:55 PM

VIDEO | स्पर्शरंग कला परिवाराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्त्रियांच्या भाळी साकारली शिवरायांची पेंटिंग

सोलापूर : आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर स्पर्शरंग कला परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्त्रियांच्या भाळी छत्रपती शिवरायांची पेंटिंग साकारण्यात आले आहे. ज्या शिवछत्र‌पतींच्यामुळे अखंड हिंदुस्थानातील स्त्रीयांचे सौभाग्य आबाधित राहिलं त्या छत्रपतींना सौभाग्याच्या लेण्यात रेखाटण्याची किमया कलाकार विपुल मिरजकर यांनी साधली आहे. यावेळी महिलांनी शिवछत्रपतींवर उत्स्फूर्तपणे कविता आणि पाळणाही सादर केला. सहशिक्षिका स्मिता काळे, सहशिक्षिका ज्ञानेश्वरी नरवडे, प्राचार्य डॉ.स्वाती जाधव, गृहिणी विद्या जाधव, आशा गुंड, गीता शेळके, मनिषा परबत या महिलांच्या कपाळी पेंटिंगच्या माध्यमातून शिवछत्रपती साकारण्यात आले आहेत. आमच्या कपाळी महाराजांना अधिष्ठान दिलेलं आहे ते मानानं मिरवण्यासारखं आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान असल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

Published on: Feb 19, 2023 04:20 PM