Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर रोषणाई, बघा आकर्षक तयारी

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर रोषणाई, बघा आकर्षक तयारी

| Updated on: Apr 14, 2023 | 7:20 AM

VIDEO | दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने बौद्ध भाविकांसाठी दीक्षाभूमी ठरले आकर्षणाचे केंद्र, बघा कशी आहे विद्युत रोषणाई

नागपूर : नागपूरसह राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागपूर मधील दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण स्तुपावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने बौद्ध भाविकांसाठी दीक्षाभूमी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे . दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर निळ्या पंचशील ध्वजांनी सजविण्यात आला आहे. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हजारो भाविक दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर दाखल होत आहे. यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने उत्कृष्ट व्यवस्था केली असून बौद्ध भाविकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या आहे.

Published on: Apr 14, 2023 07:08 AM