अंमली पदार्थ आणि तस्करी कराल तर गाठ पोलिसांशी; साडेपाच महिन्यात 253 आरोपी गजाआड
या माध्यमातून पोलिसांनी अंमली पदार्थ आणि तस्करी करणाऱ्यांना एक संदेश दिलाय. पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमेत 2700 किलो गांजा जप्त केला होता. त्यातील 1200 किलो गांजा नष्ट केला. तसेच साडेपाच महिन्यात 253 आरोपींना गजाआड केलंय.
नागपूर : अंमली पदार्थाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी कडक मोहीम सुरू केलीय. याच अंतर्गत आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवसाच्या निमित्ताने नागपूर पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेला 1200 किलो गांजा नष्ट केला. या माध्यमातून पोलिसांनी अंमली पदार्थ आणि तस्करी करणाऱ्यांना एक संदेश दिलाय. नागपूर पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमेत 2700 किलो गांजा जप्त केला होता. त्यातील 1200 किलो गांजा नष्ट केला. तसेच साडेपाच महिन्यात 253 आरोपींना गजाआड केलंय. साडेपाच महिन्यात पोलिसांनी पावणेतील कोटींचे अंमली पदार्थ जप्त केलाय. या माध्यमातून नागपूर पोलिसांनी ड्रग्स फ्री सिटीसाठी पुढाकार घेतल्याचं नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं.
Published on: Jun 26, 2023 12:46 PM