महाराष्ट्र दिनानिमित्त 'लालपरी'च्या ताफ्यातील नवी कोरी इलेक्ट्रिक बस प्रवाशांच्या सेवेत

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘लालपरी’च्या ताफ्यातील नवी कोरी इलेक्ट्रिक बस प्रवाशांच्या सेवेत

| Updated on: May 01, 2023 | 2:04 PM

VIDEO | महाराष्ट्र दिनानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण

मुंबई : राज्यभरासह देशात आज १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजकीय वर्तुळातील नेते मंडळींनी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. अशातच लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवनेरी नावाने आता ठाणे ते स्वारगेट, मुंबई ते गोवा, मुंबई ते नागपूर अशा पद्धतीने वीस इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात वीस बसेस तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये हजार बसेस मुंबई ते गोवा, मुंबई ते नागपूर आणि ठाणे ते स्वारगेट, मुंबई ते स्वारगेट अशा मार्गावर धावरणार आहे. या बसेसची वैशिष्ट्य म्हणजे या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याने ध्वनी प्रदूषणाला आळा बसणार आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, सीट बेल्ट त्यासोबतच वस्तू ठेवण्यासाठी जादा कप्पे देण्यात आले आहेत,

Published on: May 01, 2023 02:04 PM