आग्रा येथील भव्य दिव्य ताजमहल पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी, काय आहे कारण? बघा व्हिडीओ
VIDEO | आग्रा किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती अन् दुसरीकडे ताजमहल पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी, बघा व्हिडीओ
गिरीश गायकवाड, आग्रा : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त आग्र्याच्या लाल किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती साजरी केली जातेय. आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये यंदा प्रथमच शिवजयंती साजरी होतेय. आग्रात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत असताना दुसरीकडे जगातील सातवं आश्चर्य म्हणून ओळख असलेलं ताजमहाल पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटकांची तोबा गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. कारणही तसंच आहे. यंदा ताजमहालला 368 वर्ष पूर्ण होत असल्याने एक महिन्यासाठी पर्यटकांना प्रवेश निशुल्क करण्यात आला आहे आणि हेच कारण आहे की ताजमहाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढली आहे. आग्र्यात हजारोंच्या संख्येने शिवभक्त दाखल होत आहेत, हे शिवभक्त आग्र्याचा किल्ला पाहिल्यानंतर ताजमहल पाहण्यासाठी सुद्धा येत आहेत.
Published on: Feb 19, 2023 02:30 PM
Latest Videos