मातोश्री परिसरात शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गटात बॅनर वॉर, काय आहे कारण?
VIDEO | मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार बॅनर वॉर, कोणत्या कारणावरून मातोश्री परिसरात आमने-सामने?
मुंबई : येत्या १९ तारखेला असलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बांद्रातील मातोश्री परिसराबाहेर दोन्ही गटांमध्ये बॅनरवर पाहायला मिळत आहे. सोमवारी १९ जूनला शिवसेनेच्या दोन्ही गटांचा मुंबईत वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्चस्वाचा वाद चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना यांनी आजूबाजूला बॅनर्स लावल्याने सध्या मुंबईत एकच चर्चेचा विषय ठरत आहे. मातोश्रीसमोर लावलेल्या बॅनरवर निष्ठावंतांचा कुटूंबसोहळा, शिवसेना परिवार जगावेगळा असा आशय नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर ३६५ दिवस २४ तास शिवसेनेचा ध्यास, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, असेल आमची कायम साथ असा शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर आशय असल्याचे बघायला मिळत आहे.
Published on: Jun 17, 2023 12:56 PM
Latest Videos