एकनाथ शिंदे यांची नेतेपदाची शपथ कशाच्या आधारावर? वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
एकनाथ शिंदे यांना पक्षाची घटनाच मान्य नाही. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे असे कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितले.
नवी दिल्ली : शिंदे गटाची ( shinde group ) राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांनी नेतेपद घेतले तेव्हा त्यांनी नेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर घेतली होती? असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( adv. kapil sibbal ) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केला.
शिवसेना पक्ष घटनेची माहिती त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला दिली. शिवसेनेची घटना कायदेशीर नाही हे एकनाथ शिंदे गट कोणत्या आधारावर म्हणत आहे? राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीकडून पक्ष नेत्याची निवड होते असेही त्यांनी आयोगाला सांगितले.
उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला मुदत संपत आहे. त्यामुळे आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली.

VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा

दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल

'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ

स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
